शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे व शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त 'शिवसेनेचा निर्धार …प्रत्येकाला मोफत उपचार' या उपक्रमाचे उदघाटन शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. वारजे आणि हिंगणे येथील आरोग्य शिबिरात तब्बल ८०० नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. हृदयरोग , कॅन्सर, डायलेसिस, बायपास, लहान मुलांचे आजार या सर्व प्रकारच्या तपसंण्याची सुविधा करण्यात आली होती. या प्रसंगी शहर संघटक श्याम देशपांडे, शहर उपप्रमुख संदीप मोरे,सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे, निर्मला केंढे, राधिकाताई हरिश्चंद्रे, स्वीकृत सदस्य सचिन दांगट, सचिन थोरात , रविराज इंमबुलकर, मा. विभाग प्रमुख बापू निंबाळकर, मनीष जगदाळे, राजेंद्र शिळीमकर, करण जाधव, संजय खडसे, उमेश वाघ व शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने शहरातील ७६ प्रभागांमध्ये अशा प्रकारे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.




No comments:
Post a Comment